साठवण सिमेंट बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा-वीरधवल जगदाळे

दिनेश पवार:दौंड

पुणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने लिंगाळी मसनेरवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या 14 लक्ष रुपयांच्या साठवण सिमेंट बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

शेतकऱ्यांना नियमितपणे शेतीला पाणी देण्यासाठी आशा साठवण बंधाऱ्याचा उपयोग होईल तसेच परिसरातील शेती बारमाही ओलिताखाली येण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव तप्तर आहोत असे मत वीरधवल जगदाळे यांनी यावेळी व्यक्त केले, यावेळी लिंगाळी गावचे सरपंच सुनील जगदाळे,मार्केट कमिटीचे माजी संचालक काशिनाथ जगदाळे,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleयवतमध्ये महाराष्ट्र बँकेच्या ATM वर चोरट्यांचा डल्ला , तब्बल 23 लाखांची लुटली रोकड
Next articleनाशिकच्या “दुर्ग पंढरी” अभ्यास मोहीम फत्ते