नाशिकच्या “दुर्ग पंढरी” अभ्यास मोहीम फत्ते

राजगुरूनगर

नवीन वर्षाची उर्जामय सुरवात करतानाच स्वराज्य जननी जिजाऊ आऊसाहेब व हिंदू धर्माची पताका साता समुद्रापार पोहचवणारे ,कुशाग्र बुद्धिमतेचे वारसदार स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक निमित्ताने खेड चाकण येथील “शिवदुर्ग साम्राज्य प्रतिष्ठान व भटकंती गड दुर्गांची मित्र परिवार” यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील अति कठीण व सर्वात उंच किल्ल्यांची यशस्वी अभ्यास मोहीम राबविण्यात आली.

नाशिक पासून शंभर किलोमीटर अंतरावर गुजरात व नाशिक यांच्या सीमेवर असलेले हे बलाढ्य किल्ले सर्व दुर्ग भटक्यां साठी आव्हानात्मक समजले जातात .

सह्याद्रीचे मस्तक म्हणून ओळखला जाणारा साल्हेर हा सर्व दुर्गांमध्ये उंच समजला जातो.. त्या खालोखाल सालोटा, मुल्हेर, हरगड व मोरा गड हेही प्रचंड बलाढ्य व दुर्ग भटक्यांची परीक्षा पहाणारे आहेत..
शिवकाळात हे दुर्ग उत्तर दिशेचे स्वराज्याची सीमा म्हणून ओळखले जायचे आणि म्हणून या अति बलशाली व सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या दुर्गांच्या माथ्यावरून ही मानवंदना देण्यात आली..
या मोहिमेचे नेतृत्व दुर्गराज राजगड ग्रंथाचे लेखक श्री. राहुल नलावडे व सुनील क्षीरसागर यांनी केले.या मोहिमेत तानाजी राजगुडे, रवींद्र गाढवे, बाबाजी शेटे व अनेक तरुण सहभागी झाले होते.

Previous articleसाठवण सिमेंट बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा-वीरधवल जगदाळे
Next articleशोकाकुल वातावरणात जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार