चांडोली खुर्दच्या सावकाराविरोधात गुन्हा

आंबेगाव- तालुक्यातील चांडोली खुर्द येथे अवैध सावकारी करून व्याजाने दिलेल्या ८५ हजार रुपयांची परतफेड होऊनही त्याबदल्यात शेतजमिनीचे साठेखत आणि ४ लाख ३४ हजार रुपयांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी भिमाजी तुकाराम पोखरकर आणि त्याचा भाऊ भरत तुकाराम पोखरकर (रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव) विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांडोली खुर्द येथील नाना नामदेव इंदोरे यांनी पोखरकरकडून ८५ हजार रुपये व्याजाने घेतले. त्या बदल्यात जमिनीचे साठेखत पोखरकरने भाऊ भरत पोखरकरच्या नावे इंदोरेंकडून करून घेतले. त्यात साधना सहकारी बँकेचे कोरे धानादेश, स्वाक्षरी केलेले कोरे स्टॅम्प घेतले. त्यानंतर वेळावेळी ४ लाख ३४ हजार रुपये देऊ केले. त्यानंतरही इंदोरे यांच्याकडेवारंवार पैशाचा तगादा लावला. इंदोरे यांनी करून दिलेले शेतजमिनीचे साठेखत रद्द करण्याच्या बदल्यात ५९ लाख रुपयांची मागणी, तसेच धमकावुन जमिनीच्या बाहेर काढल्याबाबत सहायक निबंधकांकडे तक्रार केली. सहायक निबंधकांनी पोलिसांच्या मदतीने पथकासह भिमाजी पोखरकर यांच्या चांडोली खुर्द येथील राहत्या घरी अवैध सावकारीसंदर्भात घाड टाकून झडती घेतली. त्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे आढळली, त्यानुसार पिळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleचोरीचे दागिने विकायला आलेले चोरटे जेरब़ंद
Next articleगोलेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी पै.बाळासाहेब चौधरी यांची निवड