गोलेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी पै.बाळासाहेब चौधरी यांची निवड

चाकण – गोलेगाव पिंपळगाव (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा पै. बाळासाहेब काळुराम चौधरी तर उपाध्यक्षपदी तान्हूबाई घाडगे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

दरम्यान गोलेगाव – पिंपळगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १२ संचालकाची निवडणूक आमदार दिलीप मोहिते पाटील व खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली.

गोलेगाव सोसायटीकडून रब्बी आणि खरीप पिकांसाठी ४०० सभासदांना पावणे दोन कोटी रुपयांचे बिनव्याजी पीककर्जाचे वाटप केले जात असल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी दिली.

यावेळी संचालक संतोष चौधरी, राहुल चौधरी, सत्यवान चौधरी, गोविंद चौधरी, रमेश सोनवणे, दुर्योधन चौधरी, दत्तात्रय चौधरी, शांताबाई चौधरी, कुंडलिक चौधरी, पांडुरंग चौधरी, भगवान चौधरी, मल्हारी चौधरी, सोपान शेळके आदींसह संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleचांडोली खुर्दच्या सावकाराविरोधात गुन्हा
Next articleवाडेबोल्हाई-केसनंद निकृष्ठ दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: रामदास कोतवाल यांची मागणी