चोरीचे दागिने विकायला आलेले चोरटे जेरब़ंद

अमोल भोसले,उरुळी कांचन

चोरी करून आणलेले सोन्याचे दागिने विक्रीस आणणारे सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले.

शाहरुख सलीम शेख (वय २२ वर्ष, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली जि. पुणे, मुळगाव रा. मुरुड ता. जि. लातूर), हरीश किसन कोळपे (वय २१ वर्ष रा. वाडेबोलाई, ता. हवेली जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीकडून बजाज पल्सर २२० मोटरसायकल असा एकूण १ लाख ४२ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती गावच्या हद्दीत पोलीस अंमलदार शैलेश कुदळे व राजेश दराडे रात्री गस्त घालत असताना दोन इसम चोरी करून आणलेले सोन्याचे दागिने घेऊन ते विक्रीस आले आहेत अशी माहिती त्यांना मिळाली. त्या माहितीनुसार शेख आणि कोळपे यांना सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे दागिने कोरेगाव (ता. शिरूर, जि. पुणे) गावच्या हद्दीतून चालत्या रिक्षामधून मोटारसायकल वरून हिसकावून घेतलेले असलेले आरोपींनी कबुली दिली आहे.आरोपींवर रांजणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण, सुपा पोलिस स्टेशन अहमदनगर येथे भा.द.वि.क.३९२,३४ नुसार गुन्हा दाखल आहे.

पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन गायकवाड, अमित साळुंके, संभाजी देविकर, श्रीनाथ जाधव, राजेश दराडे, शैलेश कुदळे बाजीराव वीर या पथकाने ही कामगिरी केली.

Previous articleदौंड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
Next articleचांडोली खुर्दच्या सावकाराविरोधात गुन्हा