नारोडी येथील गॅस कंपनीत चोरी ; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

आंबेगाव  –  तालुक्यातील नारोडी येथील कल्प गॅस कंपनीत असलेल्या १४ हजार रुपये किमतीच्या स्पेक्टा कंपनीच्या दोन बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना (दि.७ ते ८)रोजीच्या दरम्यान घडली आहे. याबाबत कंपनीच्या सुपरवायझर आकाश अशोक तोत्रे (रा. कुरवंडी ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी कि, फिर्यादी हे ( दि.७ )रोजी नेहमीप्रमाणे नारोडी येथे कल्प गँस कंपनीत कामावर गेले असता त्यावेळी एकुन ८ वर्कर व नवनाथ घोडेकर हा सेक्युरिटी होता. सायंकाळी फिर्यादी सुपरवाईझर काम उरकून घरी आला असता त्यावेळी नवनाथ घोडेकर ड्युटीवर होता त्याची ड्युटी संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत होती व त्यानंतर अक्षय वायकर हा ड्युटीवर आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी हे कामावर जाऊन गॅस कंपनीच्या पाठीमागे राऊंड मारत असताना त्यांना फायर इंजिनला लावलेल्या बॅटऱ्या दिसल्या नाही याबाबत त्यांनी दोन्ही सेक्युरिटी गार्डला बोलावून विचारले असता त्यांनी याबाबत आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी गॅस कंपनी मालक नेहरू तायवंडे, सेक्युरिटी कंपनी मालक दिपक पोखरकर यांना फोन करून बोलावून कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्या असता कॅमेरा मध्ये काही आढळून आले नाही. त्यांनी परिसरात व आजूबाजूला बॅटरीचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही. कंपनीतील बॅटर्‍या कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात येताच सुपरवायझर यांनी याबाबत घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.

Previous articleलग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल
Next articleखंडणीप्रकरणी तिघांना अटक