खंडणीप्रकरणी तिघांना अटक

चाकण- येथील एकाकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. नीलेश भरत कुचेकर, राहुल शंकर पारवे, सुदर्शन ऊर्फ गुड्ड्या सनील आरकडे (सर्व रा. चाकण, ता. खेड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अतुल दिलीप राऊत (रा. नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड) यांनी फिर्याद दिली आहे. ते त्यांच्या अशोक लेलॅंड गाडीमध्ये चाकण येथून तीन वासरे चाकण बाजारातून घेऊन चालले होते. यावेळी आरोपींनी, ‘आम्ही प्राण्यांचे कार्यकर्ते असून, तुम्ही वासरे कत्तलीकरिता घेऊन जात असल्याची केस तुमच्यावर करतो,’ अशी दमदाटी केली. तसे, केस न करण्यासाठी आम्हाला दोन हजार रुपयांचा हप्ता द्या, असे सांगून आरोपीकडून दोन हजार रुपये घेऊन गेले. हा प्रकार शनिवारी (ता. ८) दुपारी अडीचच्या सुमारास घडला, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस उपनिरीक्षक शेंडकर यांनी दिली.

Previous articleनारोडी येथील गॅस कंपनीत चोरी ; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
Next articleसहजपूर येथे आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह