लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल

मंचर

कोरोना व ओमायक्रोन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत लग्नाच्या रिसेप्शनला  १०० ते १५० लोकांना एकत्र जमून कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजक भालचंद्र सखाराम कानडे ( वय ५५ रा.कळंब माळीमळा ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद पो. कॉ. सुनील काटे यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली आहे.

याबाबत मिळलेली माहिती अशी की, जिल्हाधिकारी यांनी कोरोना आजार व ओमायक्रोन व्हेरीयंटचा चा संसर्ग रोखण्याकरिता ( दि.४) पासून आदेश दिलेला आहे.( दि.८) रोजी कळंब गावच्या हद्दीत डीजे चालू असल्याची माहिती मंचर पोलिसांना कळली असता याबाबत पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस सबइन्स्पेक्टर आर.बी. बांबळे, पोलीस कॉन्स्टेबल एफ. ए. मोमीन पोलीस कॉन्स्टेबल सुनील काठे हे घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी लग्न रिसेप्शन कार्यक्रम सुरू होता व त्या कार्यक्रमात शंभर ते दीडशे लोक एकत्र जमले होते. याबाबत पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी घेतली आहे का याबाबत विचारले असता कार्यमालक भालचंद्र सखाराम कानडे (वय 55 ,रा. कळंब यांनी या कार्यक्रमासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले .

याबाबत कार्यमालक यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत सोशल डिस्टंसिंग न पाळता शंभर ते दीडशे लोकांना एकत्र जमवून कोरोना व ओमायक्रोन या आजाराचा संसर्ग वाढेल असे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथीचे रोग कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करत आहेत

Previous articleरायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
Next articleनारोडी येथील गॅस कंपनीत चोरी ; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल