दिव्यांग कल्याणकारी संघटनेच्यावतीने लुई ब्रेल जयंती उत्साहात साजरी

गणेश सातव,वाघोली- पुणे

अखिल दृष्टीहीन समुदायाला खोल अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांना प्रकाश वाटा व ज्ञानाची दारे खुली करून देणाऱ्या लुई ब्रेल यांच्या २१३ व्या जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग कल्याणकारी संघटनेच्या माध्यमातून( मुक्काम पोस्ट पाटण, तालुका-मावळ,जिल्हा- पुणे ) येथे ५ जानेवारी रोजी संघटनेच्या सभासद बंधू-भगिनींच्या उपस्थितीत लुई ब्रेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळ तालुका युवा सेनेचे उपाध्यक्ष व रेम्बो उद्योग समूहाचे संस्थापक विजय भाऊ तिकोणे तसेच भारतीय जनता पक्ष मावळ तालुका दिव्यांग आघाडीचे उपाध्यक्ष सुनील अण्णा जाधव तसेच सुशांत मराठे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन लुई ब्रेल व डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमांचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष नवनाथ रणदिवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व संघटनेची ध्येय,धोरणे,उद्दिष्टे स्पष्ट केली. यात बोलताना त्यांनी अपंगांमधील बेरोजगारीवर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शक्य ते सर्व प्रयत्न करून जास्तीत जास्त लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा दृढ संकल्प येथे बोलून दाखविला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भाऊ तिकोणे यांनी अंधांना ज्ञानाची दारे खुली करून देणाऱ्या लुई ब्रेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला व अशा थोर पुण्य आत्म्याचे स्मरण होणे आवश्यक आहे असे उद्गार काढले. तसेच भविष्यात संघटनेला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविली.तिकोने यांनी उपस्थित सर्व सभासद बंधु भगिनी साठी दिनांक ४ व ५ जानेवारी या दोन दिवशी मुक्काम पोस्ट पाटण येथे त्यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर सर्व सभासद बंधु भगिनीची निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था केली त्याबद्दल संघटनेचे रवींद्र काळे व उपाध्यक्षा वैशालीताई रवींद्र काळे यांनी आभार मानले व त्यांचा यथोचित सत्कार केला.

संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष शब्बीर शेख यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचा हातभार लावला.संघटनेचे सल्लागार व कार्यकारणी सदस्य राजू बाणमारे यांनी लुई ब्रेल यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना सांगितली.कार्यकारणी सदस्य मच्छिंद्र राणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य व सल्लागार मधुकर गायकवाड यांनी केले व अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे बोलून दाखविले.

सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कार्यकारणी सदस्य पप्पू काटे अश्विनीताई पप्पू काटे यांचा सिंहाचा वाटा होता. संघटनेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नागरिक सेलच्या राज्यप्रमुखपदी सोनबा चौधरी यांची निवड
Next articleनारायणगावच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे आरिफ आतार यांची निवड