नारायणगावच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे आरिफ आतार यांची निवड

नारायणगाव ,किरण वाजगे

उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी तसेच जुन्नर तालुक्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नारायणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच पुष्पा आहेर यांनी काही महिन्यांपूर्वी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. दरम्यान अरिफ आतार हे गेले २० वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये आरिफ आतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, माजी सरपंच अशोक पाटे, एकनाथ शेटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे, अशिष माळवदकर, दीपक वारुळे, मेहबूब काझी, रशिद इनामदार, ज्ञानेश्वर औटी, संतोष दांगट, विकास तोडकरी, ग्राम विकास अधिकारी नितीन नाईकरे, दिनेश वाव्हळ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

उपसरपंच निवडीनंतर माजी शिवसेना उपतालुकाप्रमुख रशिद इनामदार, सरपंच पाटे, संतोष खैरे, अनिल दिवटे, ज्ञानेश्वर औटी, सारिका डेरे यांसह अनेकांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
निवडीनंतर नुकत्याच उद्घाटन झालेल्या शिव छत्रपती महाद्वारावरील शिवाजी महाराजांच्या शिवशिल्पाचे सरपंच, उपसरपंच सर्व उपस्थितांनी दर्शन घेतले.

दरम्यान उर्वरित कालावधीमध्ये आपण गावातील प्रलंबित कामे व विविध विकास कामे प्राधान्याने करण्यास कटिबद्ध असल्याचे अरिफ आतार यांनी सांगितले.

Previous articleदिव्यांग कल्याणकारी संघटनेच्यावतीने लुई ब्रेल जयंती उत्साहात साजरी
Next articleदौंड पोलीसांच्या नाकाबंदीमुळे दुचाकी चोर अटकेत