राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नागरिक सेलच्या राज्यप्रमुखपदी सोनबा चौधरी यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

सोरतापवाडी (ता.हवेली) येथील सोनबा शिवाजी चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेष्ठ नागरिक सेलच्या महाराष्ट्र राज्यप्रमुखपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

खासदार सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तामामा भरणे, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर या सर्वाच्या सहकार्याने पुणे जिल्हा जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जेष्ठ नागरिकांन पर्यंत सभासद नोंदवून पोचविण्याचा पर्यंत केला. तसेच अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले या माध्यमातून पक्षाची धेय्य धोरण तळागाळापर्यंत पोचविण्याचा पर्यंत केला असल्याने म्हणून पक्षातील वरिष्ठ मंडळीने माझ्या कामाची दखल घेऊन राज्याची जबाबदारी दिल्याने माझी जबाबदारी अधिक वाढली असल्याने ती पक्षातील आजी माजी पदाधिकारी यांच्या माध्यमातून पार पडणार असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेष्ठ नागरिक नुतन राज्यप्रमुख सोनबा चौधरी यांनी सांगितले.

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात माजी विद्यार्थीचा स्नेह मेळावा संपन्न
Next articleदिव्यांग कल्याणकारी संघटनेच्यावतीने लुई ब्रेल जयंती उत्साहात साजरी