खळबळजनक- राजगुरूनगरमध्ये डोक्यात वरवंटा घालून‌ मुलाने केली बापाची हत्या

राजगुरुनगर :  बापाने स्व:ताच्या लग्नासाठी वधु – वर सुचक मंडळात विवाह नांव नोंदणी केल्यामुळे चिडून जाऊन मुलाने  वरवंटा डोक्यात घालून‌ बापाची हत्या केल्याची घटना राजगुरूनगर शहरात मध्ये घडली आहे. या घटनेन एकच खळबळ उडाली आहे.

शंकर रामभाऊ बो-हाडे ( वय ८० रा, वैशांयपन आळी, राजगुरूनगर ता. खेड) असे हत्या झालेल्याचे नांव आहे.  शेखर शंकर बो-हाडे (वय ४७ ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव‌ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर रामभाऊ बो-हाडे यांनी वधु – वर सुचक मंडळात पैसे भरून स्वत:च्या लग्नाची नोंदणी केली होती. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने शेखर बोऱ्हाडे यांने किचन रूममधील सुरी घेवुन वडीलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. घरात असलेल्या दगडी वरवंटा शंकर बोऱ्हाडे यांच्या तोंडावर व डोक्यात हाणून खून केला.  पुढील तपास खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव करत आहे.

Previous articleराम नगरकर कला गौरव पुरस्कार “महाराष्ट्राची हास्य जत्रा” फेम कलाकार समीर चौगुले यांना प्रदान
Next articleमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पुणे विभाग ठरला पर्यटनामध्ये सरस