महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा पुणे विभाग ठरला पर्यटनामध्ये सरस

पुणे- संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणुचे थैमान कमी होताच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे विभागाने कलेल्या उपाययोजनांमुळे पुणे विभागातील पर्यटक निवासांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महामंडळाच्या अर्ध वार्षिक आढाव्यामध्ये पुणे विभागातील पर्यटक निवास ठरली आहेत. महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी राबविलेल्या नवनवीन संकल्पना, कोरोना विरोधातील राबविलेल्या उपाययोजना , पर्यटकांना दिलेल्या सर्वोत्तम सुविधा यांमुळे पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना पर्यटकांनी पुन्हापुन्हा भेट दिली.

 

मागिल वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुणे विभागातील पर्यटक निवासांमध्ये वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर या अभिनव संकल्पनांमुळे महामंडळाच्या पर्यटकांमध्ये लक्ष्णीय वाढ दिसून आली आहे. टाळेबंदीमुळे कंटाळलेल्या पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहीत वेबसाईट, फेसबुक आणि Whuts app ग्रुप च्या माध्यमातून देण्यात आल्याने आणि पर्यटनाची प्रसिध्दी विविध माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचविल्यामुळे पुणे विभागातील पर्यटनास नवा आयाम मिळाला आहे असुन खाशा पर्यटकांना पर्यटनाची ओढ निसर्गरम्य पर्यटनस्थळाकडे खचुन ओढण्यात यशस्वी झाली आहे. पर्यटकांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतानाही महाराष्ट्र पर्यटनटन विकास महामंडळाने सर्वच पर्यटक निवास / रिसॉर्ट मध्ये पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा दिल्यामुळे तब्बल २ वर्षांनंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता आला आहे. पर्यटक निवासांसाठी विविध निर्जंतुकीकरणाच्या अव्याहतपणे सुरु असलेल्या उपाययोजना, उपहारगृहे आणि अनुषंगिक बाबांची काटेकारपणे केलेली स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण तसेच शरिराचे तापमान मोजणारी  यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपटटी, हातमोजे अशी व्यवस्था, येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकिय कारणांसाठी दिलेली सुविधा यांमुळे महामंडळाची पर्यटक निवासे पर्यटकांना आरोग्यासाठी उत्तम असण्याची खात्री पटली आहे. त्यामुळे डिसेंबर, नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देत भरघोस प्रतिसाद दिला आहे.

मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करण्यासाठी पर्यटकांनी निसगांकडे धाव घेतली होती. डिसेंबर आणि नाताळच्या हंगामामध्ये पर्यटकांसाठी महामंडळाकडुन अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे स्थानिक स्तरावर स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना आणि उभरत्या कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. विविध छंद, पारंपारीक खेळ. छोटे सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी बाबमुळे पर्यटकांचा पर्यटनाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

महामंडळाच्या अर्धवार्षिक आढाव्यामध्ये श्री. विष्णु गाडेकर व्यवस्थापक असलेले माळशेज घाट पर्यटक निवासांस एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेले पर्यटक
निवास म्हणुन प्रमाणित करण्यात आले असून श्री. सुहास पारखी व्यवस्थापक असलेले महाबळेश्वर पर्यटक निवासास नोव्हेंबर महीन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम पर्यटक निवास म्हणुन गौरविण्यात आले आहे. श्री. गणेश मोरे व्यवस्थाक असलेल्या पानशेत पर्यटक निवासास एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम परफॉर्मन्स असलल पर्यटक निवास म्हणून गौरविण्यात आले आहे. या सर्वोत्तम कामगिरीबददल प्रादेशिक व्यवस्थापक  दिपक हरणे यांना महामंडळाने खास प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोतम प्राधान्य देताना पर्यटनांचा आनंद कमी न होता मा. व्यवस्थापकिय संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संकल्पना राबवुन पर्यटनास वेगळी दिशा देता आली आहे. वर्क फ्रॉम नेचर, मातीच्या भांडयातील जेवण, अनुभवात्मक पर्यटनांअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक कलाकारांना आणि खाद्यपदार्थाना दिलेलं प्राधान्य यांमुळे पर्यटकांना आपल्या पर्यटनाचे प्रसंग संस्मरणीय करता आले. त्यामुळे पर्यटकांनीही निसर्गाचे आणि कोरानाचे भान ठेवून शासकिय नियमांचे पुरेपुर पालन करीत पर्यटनाचा, नव वर्ष स्वागताचा आनंद घेतला. आगामी कालावधीत अनुभवात्मक पर्यटनाबरोबरच वेगवेगळ्या अभिनव संकल्पना राबवुन पर्यटनामध्ये वाढ करण्याचा संकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक  दिपक हरणे यांच्या कडून करण्यात आला आहे.

Previous articleखळबळजनक- राजगुरूनगरमध्ये डोक्यात वरवंटा घालून‌ मुलाने केली बापाची हत्या
Next articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडत पार