Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव ,किरण वाजगे
राम नगरकर कला अकादमी, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा राम नगरकर कला गौरव पुरस्कार २०२१, यावर्षी नाट्य, चित्रपट व छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ विनोदी कलाकार समीर चौगुले यांना प्रदान करण्यात आला.
सोनी मराठी टीव्ही चॅनेल वरील लोकप्रिय मालिका “महाराष्ट्राची हास्य जत्रा”*या कार्यक्रमात मुख्य कलाकार समीर चौगुले यांना पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात गुरुवार दि. ०६ रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक, निर्माते, दिग्दर्शक सचिन गोस्वामी, वंदन राम नगरकर, समाजसेविका रेणूताई गावस्कर, प्रा. मिलिंद जोशी, समिर बेलवलकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी श्री माताजी निर्मला देवी सहजयोगा ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील धायडे, पुणे प्रतिष्ठान समन्वयक डॉ. उत्तम गजरे, उदय नगरकर, वास्तुतज्ञ मुकुंदराज ढिले, पवन गोसावी, निलेश हांडे, ज्येष्ठ पत्रकार किरण वाजगे उपस्थित होते.
दरम्यान या पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमापूर्वी वंदन राम नगरकर प्रस्तुत प्रा महेंद्र गणपुले, दिलीप हल्याळ, रत्ना दहिवेलकर आणि बंडा जोशी या चार विनोदी कलाकारांचा ‘हास्यजल्लोष’ हा कार्यक्रम उपस्थित कला रसिकांचे निखळ मनोरंजन करून संपन्न झाला.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमात सन्मानपत्राचे वाचन प्रतिभा देशपांडे यांनी केले. यावेळी राजेश दामले यांनी कलाकार समीर चौगुले यांची प्रकट मुलाखत घेतली. सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले. तर आभार संध्या नगरकर-वाघमारे यांनी मानले.
Download WordPress Themes Nulled and plugins.