धक्कादायक! पुण्यात २९ वर्षीय महिला वकिलावर पोलिसानेच केला बलात्कार

पुणे- मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस काँस्टेबलने महिला वकीलाशी शरीर संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी पोलीस काँस्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्मण गंगाधर राऊत (वय ३३, रा. पत्रा चाळ, पाषाण मुळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस काँस्टेबलचे नाव आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या महिला वकिलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि लक्ष्मण राऊत यांची मार्च २०२० मध्ये मेट्रोमोनियल या विवाहाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली. राऊत याने फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन त्यांच्याशी ओळख वाढविली. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना देहुरोड पिंपळे निलख येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवले. लग्नास नकार देऊन फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Previous articleपारगाव शिंगवे येथे अवैद्य दारू विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांची कारवाई
Next articleएचडीएफसी बँकेतील क्रेडिट कार्ड डिपारमेंटच्या त्रासाला कंटाळून वीटभट्टी व्यावसायिकाची आत्महत्या