ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावरून गेल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मंचर – आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीतील दत्त मंदिराजवळ शेत जमिनी मध्ये ट्रॅक्टर मागे घेत असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अंगावर गेल्याने १८ वर्षे तरुणाचा मृत्यू झाली असल्याची घटना( दि.३०.डिसेंबर ) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली . याबाबतची फिर्याद ताराचंद्र पंढरीनाथ भोसले यांनी मंचर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ताराचंद्र भोसले हे ऊस तोड कामगार असून ते आपल्या कुटुंबासोबत ऊसतोडणीचे काम करत असतात. वडगाव काशिंबेग येथे ( दि.३०) रोजी शेतात ऊस तोडणीसाठी गेले असताना यांचा मुलगा प्रेमचंद ताराचंद भोसले ( वय १८ )हा झोपडीजवळ झोपलेला असताना ट्रॅक्टर नंबर एम एच ३१ ए ९६३२ चालक रोहन शिंदे हा ट्रॅक्टर पाठीमागे घेत असताना मुलगा प्रेमचंद त्याच्या अंगावर ट्रॅक्टरची मागील ऊस वाहतूक करणारी ट्रॉली अंगावरुन गेली. यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला खासगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तो सकाळी १०:४३ पूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले.

याबाबत फिर्यादीला तुमचा मुलगा ट्रॉली वरून खाली पडल्याने जखमी होऊन मयत झाला असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र झाल्या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी चौकशी केल्यानंतर त्यांच्या मुलाचा मृत्यू अंगावर ट्रॉली गेल्याने झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ट्रॅक्टर चालक रोहन यशवंत शिंदे (रा. रोहितळ ता. गेवराई जिल्हा बीड ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

Previous articleफॉरेनर असल्याचे भासवून दोन भाबट्यांनी मोबाईल शॉपी दुकानदाराला ४६ हजाराचा घातला गंडा ; घटना सीसीटिव्हित कैद
Next articleपारगाव शिंगवे येथे अवैद्य दारू विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांची कारवाई