फॉरेनर असल्याचे भासवून दोन भाबट्यांनी मोबाईल शॉपी दुकानदाराला ४६ हजाराचा घातला गंडा ; घटना सीसीटिव्हित कैद

राजगुरुनगर – इंग्रजी भाषेत संभाषण करून फॉरेनर असल्याचे भासवून हातचलाखी करून दोन भाबट्यांनी मोबाईल शॉपी दुकानदाराला ४६ हजाराचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.हि घटना सीसीटिव्हित कैद झाली आहे.

याबाबत मोबाईल दुकानदार तुषार चंद्रकांत घुमटकर, (रा. समतानगर, माळीमळा, राजगुरूनगर ) यांनी दोन अज्ञात व्यक्ती विरोधी विरोधात खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथील धनश्री चौकातील महालक्ष्मी मोबाईल शॉपी येथे दुकानात फिर्यादी घुमटकर असताना दोन इंग्रजीत बोलणारे भांबटे आले. त्यांनी दुकानातुन कार्ड रिडर खरेदी करून तीस रुपये रोख दुकानदारास दिले. तसेच भांबट्यांनी त्यांचा जवळील शंभर व दोनशेच्या नोटा फिर्यादी दाखवून दोन हजार रुपये सुट्टे मागितले. इंग्रजीत बोलत असल्याने फॉरेनर असल्याचे फिर्यादी वाटले.

दोन हजाराची नोट नसल्याने फिर्यादीने विश्वासाने पाचशे रूपयाच्या नोटा असलेले पाकीट त्याचेकडे बघायला दिले असता, त्यानी पाकीटातील पाचशे रुपयाच्या ९२ नोटा दोन हजाराची नोट पाहण्याचा बहाना करून खालीवर करून हातचलाखी करून खिशात ठेवल्या. बाकीच्या गल्ल्यातील नोटा फिर्यादीच्या हातात गल्ल्यात ठेवायला देऊन ४६ हजारांची रक्कम हातोहात हातचलाखी करुन लांबवली. पुढील तपास खेड पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार संदिप कारभळ करत आहे..

Previous articleश्री संत सटवाजी बाबा महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता
Next articleट्रॅक्टरची ट्रॉली अंगावरून गेल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू