मलठण-लिंगाळी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींना कचरापेट्यांचे वाटप

दिनेश पवार:दौंड

जिल्हा परिषद पुणे,केंद्र पुरस्कृत 15 व्या वित्त आयोग 2020-2021अंतर्गत,जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या प्रयत्नातून लिंगाळी-मलठण जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींना कचरा संकलन व नियंत्रण करण्यासाठी कचरा पेंटींचे वाटप करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ग्रामपंचायत लिंगाळी,देऊळगाव राजे,गोपळवाडी,आलेगाव,खोरवडी,बोरिबेल, शिरापूर,हिंगणी बेर्डी,वडगाव दरेकर,पेडगाव,मलठण,वाटलूज,नायगाव आदी ग्रामपंचायतींना कचरा पेंटींचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सदस्य ताराबाई देवकाते,लिंगाळी ग्रामपंचायत सरपंच सुनील जगदाळे,अमित गिरमकर,संभाजी खैरे तसेच गटातील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleवाकी मध्ये सावित्रीच्या लेकींचा गौरव
Next articleचाकणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार : गरोदर राहिल्याने उघडकीस आला प्रकार