चाकणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार : गरोदर राहिल्याने उघडकीस आला प्रकार

चाकण – खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केले.हा प्रकार (३१) डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. त्यानंतर याप्रकरणी शनिवारी (दि. १) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपिल दिलीप कारामुंगे (वय २१, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. मूळ रा. सावरगाव, ता. लोहा, जि. नांदेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत नाणेकरवाडी येथे घडला आहे. आरोपी कपिल याने पीडित १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर कपिल याने पीडित मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Previous articleमलठण-लिंगाळी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींना कचरापेट्यांचे वाटप
Next articleकोविड प्रतिबंधक लसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड