वाकी मध्ये सावित्रीच्या लेकींचा गौरव

चाकण-क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन पीडित महिलांना  स्वाभिमान, सन्मान मिळवून देण्याचे सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या महिलांचा वाकी बुद्रुक गावच्या महिला उपसरपंच राजश्री विश्वास टोपे यांच्या हस्ते क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र पुस्तक देऊन सावित्रीच्या लेकींचा सन्मान करण्यात आला.

खेड तालुक्याच्या मंडलाधिकारी सविता घुमटकर,तलाठी मनीषा राऊत,पारखी मॅडम,प्राथमिक केंद्र वैद्यकीय आरोग्य अधिकारी खेड पूनम चिखलिकर, डॉ.वर्षा वाळुंज,डॉ.कल्याणी पाटील, अँड.भाग्यश्री मुळूक,अँड.मंजू कड, महिला पोलिस अधिकारी प्राजक्ता राक्षे,कामगार तलाठी शुभांगी पाटील-देसाई,ग्रामसेविका शीतल लकारे मॅडम, महिला कर्मचारी मनीषा गारगोटे, सौ.आशा गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी बु. पत्रेवस्ती मुख्याध्यापिका अश्विनी राऊत, शिक्षिका,साधना सांडभोर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी वाकी बु .ग्रामपंचायत सदस्या सौ. सुनीता कड, रेखा टोपे, स्वाती टोपे, करिष्मा टोपे आदी उपस्थित होते.पुणे जिल्हा मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष विश्वास टोपे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Previous articleपी के इंटरनॅशनल स्कूल येथे ‘आनंदोत्सव’ उत्साहात साजरा
Next articleमलठण-लिंगाळी जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायतींना कचरापेट्यांचे वाटप