श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

घोडेगाव- येथील अग्रगण्य असलेल्या श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त काढलेल्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला .

दिनदर्शिकेचे पूजन घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे माजी सरपंच रूपालीताई झोडगे, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योतीताई घोडेकर ,पत संस्थेच्या संचालिका रत्नाताई गाडे ग्रामपंचायत सदस्य शोभा सोमवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पुरुषोत्तम खंडू भास्कर, घोडेगावच्या सरपंच क्रांती गाढवे ,उपसरपंच सोमनाथ काळे ,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे, घोडेगावच्या माजी सरपंच रूपालीताई झोडगे, अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योतीताई घोडेकर ,ग्रामपंचायत सदस्य शोभा सोमवंशी, युवा नेते विजय घोडेकर ,संस्थेचे संचालक कैलास शेठ सोमवंशी, लक्ष्मण नाना झोडगे ,अजित खिवंसरा, गोविंद आप्पा घोडेकर ,रत्नाताई गाडे, संस्थेचे सल्लागार दिपक शेठ लोढा, महेंद्र शेठ गांधी ,निलेश बेलापुरकर, त्याचप्रमाणे सुयोग प्रासादिक भजन मंडळाचे बुवा विठ्ठल करवंदे ,मच्छिंद्र भास्कर ,खंडू झोडगे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भास्कर यांनी केले

Previous articleमोशीमध्ये पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून
Next articleपी के इंटरनॅशनल स्कूल येथे ‘आनंदोत्सव’ उत्साहात साजरा