मोशीमध्ये पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून

पिंपरी-  पूर्ववैमनस्यातून अपहरण करून एकाचा खून केल्याची घटना घडली आहे. खडीमशीन रोड, मोशी येथे गुरुवारी (दि. ३०) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बबन बाबासाहेब केंगार (वय ४० रा. मोशी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी (वय ३५) यांनी शुक्रवारी (दि. ३१) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मयूर अनिल सरोदे, गौरव सरोदे, अनिल सरोदे यांच्यासह त्यांचे इतर मित्र (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचे पती बबन यांचे बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास थरमॅक्स चौक येथून अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून बबन यांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर बबन यांचा मृतदेह खडी मशीन रोड येथे निर्जन ठिकाणी टाकून दिला.

Previous articleखळबळजनक! पुण्यात पोलिसानेच दिली पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी
Next articleश्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन