पी के इंटरनॅशनल स्कूल येथे ‘आनंदोत्सव’ उत्साहात साजरा

महाळुंगे – पी के फांउडेशन संचालित पी के इंटरनॅशनल स्कूल, चाकण येथे ‘आनंदोत्सव २०२२’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध खाद्यपदार्थांचे आणि मनोरंजन खेळांच्या स्टॉल लावले. एक दिवस विद्यार्थी दुकानदार, व्यावसायिक बनले. पालकांनी सर्व विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट देऊन विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी विविध वस्तू व भाजीपाला विक्री करीत खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला. भाजीपाला खरेदीसाठी पालक व शिक्षकांनी उत्साह दाखविला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे गिरविले.
आनंदउत्सवा मध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद उत्साहाचे आयोजन केले जाते.

पी के फांउडेशन संचालित, पी के इंटरनॅशनल स्कूल, चाकण, पुणे येथे आनंदोत्सव २०२२ उत्साहात साजरा झाला. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने विविध खाद्यपदार्थांचे आणि मनोरंजन खेळांच्या स्टॉलचे आयोजन केले. चिमुकल्या विद्यार्थ्यांसह पालकांनीही सर्व स्टॉलला भेट दिली. प्रत्यक्ष स्टॉलला भेट दिल्यानंतर आनंदासह विद्यार्थ्यांच्या विविध गुणांचा विकास होत असल्याचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा, पी के फाऊंडेशनच्या संचालक इंजिनीअर, ॲड कु.अक्षता प्रताप खांडेभराड यांनी यावळी आपले मत व्यक्त केले.


तब्बल दीड वर्षांनंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटल्याने पी के फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पी के फांउडेशनच्या प्रतिनिधी कु. निकिता प्रताप खांडेभराड, पी के इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सुवर्णा तिकोणे, प्रशांत बावधानकर, प्रियंका कड तसेच विद्यार्थ्यांचे पालक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी शितल बिरादारने केले.
दरम्यान, संपुर्ण कार्यक्रम कोविड १९ चे सर्व नियम पाळून पार पडला.

Previous articleश्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
Next articleवाकी मध्ये सावित्रीच्या लेकींचा गौरव