ट्रक व दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील कळंब गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे रोडवर ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ( दि.30 ) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या प्रकरणी संदेश शिवाजी भालेराव ( वय 32 रा. कळंब ता. आंबेगाव जि. पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती, अशी की (दि. 30) रोजी फिर्यादीचा भाऊ दिपक उर्फ सचिन शिवाजी भालेराव ( वय 29 रा.कळंब ता.आंबेगाव) हा त्याच्या ताब्यातील शाईन मोटरसायकल एम.एच.14 जे. एफ. 1370 या दुचाकी वरून नारायणगाव बाजूकडून कळंब बाजूकडे पुणे नाशिक हायवे रोड येत असताना त्याने नारायणगाव बाजूकडे जाणारा ट्रक नंबर आर जे 19 जी जी 3258 या ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्याची ड्रायव्हर बाजूस जोरात ठोसर लागल्याने अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मयत झाले असल्याचे सांगितले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

Previous articleकोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बैलगाडा शर्यतींना स्थगिती
Next articleगणेश फुटांचे यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ कलारत्न पुरस्काराने गौरव