कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बैलगाडा शर्यतींना स्थगिती

पुणे-न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी सशर्त हटवल्यानंतर अनेक वर्षानंतर पुणे जिल्ह्यातील लांडेवाडी (ता.आंबेगाव) व नाणोली (ता.मावळ) येथे १ जानेवारी रोजी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे बैलगाडा प्रैमीमध्ये उत्साह संचारला होता.

परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दी जमेल या कारणाने पुणे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी पुढील आदेश येईपर्यंत बैलगाडा शर्यंतीना स्थगिती दिली असुन,कोरोनाचे सावट हटे पर्यंत बैलगाडा प्रेमींना शर्यतीची वाट पहावी लागणार आहे.

Previous article९ लाख १४ हजार ४३२ रुपयांचा बनावट दारू साठा व मुद्देमाल हस्तगत
Next articleट्रक व दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू