गणेश फुटांचे यांचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ कलारत्न पुरस्काराने गौरव

दिनेश पवार,दौंड

 मनुष्यबळ विकास  लोकसेवा अकादमी आयोजित गुणीजन गौरव पुरस्कार सोहळा २४ डिसेंबर २०२१ रोजी नुकताच पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये दौंड येथील गणेश विष्णु फुटाणे यांना कला क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध वक्ता,कवी, लेखक व पत्रकार माननीय शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर व तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रसाळ व डॉक्टर शुभदा जोशी उपस्थित होते.

पंधरा वर्ष अविरतपणे कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गणेश फुटाणे यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युद्ध आयडॉल कलारत्न पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड यांच्या हस्ते पुणे येथे टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे कला क्षेत्रामध्ये अधिक जोमाने कार्य अविरतपणे चालू राहील असे ग्वाही गणेश फुटाणे यांनी सभागृहात दिली.

Previous articleट्रक व दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू
Next articleअवैद्य बनावट दारूचा साठा जप्त ; खेड तालुक्यातील दोघांना पोलीस कोठडी