शेतकऱ्याच्या गोठ्यातून जर्सी गाईची चोरी

आंबेगाव – तालुक्यातील सालोबामळा ( घोडेगाव ) येथील एका शेतकऱ्याने गोठ्यात बांधलेली जर्सी गाईची अज्ञात चोरट्याने चोरी केली .

मिळालेल्या माहितीनुसार, घोडेगाव परीसरातील सालोबामळा येथील शेतकरी जालिंदर घोडेकर यांच्याकडे दोन जर्सी गाई पाळल्या होत्या.गाईंना ते त्यांच्या घरासमोरील असणाऱ्या गोठ्यामध्ये बांधत असतात. रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी गाई गोठ्यात बांधून त्यांना वैरण टाकून घरात झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे उठून ते गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्यामध्ये बांधलेल्या दोन गाईपैकी कपाळावर पांढरा टिक्का असलेली गाय दिसली नाही.त्यांनी गाईचा शोध आजूबाजूच्या परिसरात घेतला असता ती मिळून आली नाही. ही गाय अज्ञात चोरट्यांनी दोरीसह चोरून नेली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Previous articleखळबळजनक – चाकणमध्ये एकाला ८५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे फरार
Next articleआळंदी ग्रामीण रूग्णालयात बॅटऱ्यांची चोरी