आळंदी ग्रामीण रूग्णालयात बॅटऱ्यांची चोरी

आळंदी – ग्रामीण रुग्णालयातून नऊ एक्साईड पॉवर प्लस इन्व्हर्टर बॅटऱ्यांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची तक्रार आळंदी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

याप्रकरणी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणपत जाधव यांनी तक्रार आळंदी पोलिस ठाण्यात दिली

तक्रारीत जाधव यांनी म्हटले की, मार्च महिन्यापासून ग्रामिण रुग्णालयातील इनव्हर्टर बॅटऱ्यांची चोरी होत आहे. सुमारे सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल आजपर्यंत रुग्णालयातून चोरी झाला. शहराच्या मध्यवर्ती आणि पोलिस ठाण्याला लागूनच असलेल्या ग्रामीण रूग्णालयात होत असलेल्या चोरीच्या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.

Previous articleशेतकऱ्याच्या गोठ्यातून जर्सी गाईची चोरी
Next articleआळंदी ग्रामीण रूग्णालयात बॅटऱ्यांची चोरी