खळबळजनक – चाकणमध्ये एकाला ८५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे फरार

चाकण – पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी ८५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  बुधवारी ( दि. २९ ) ही कारवाई केली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अखत्तर शेखावत अली शेख ( वय ३५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

तसेच पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल होताच झेंडे फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,२७ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तरुणाच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ७० हजारांची लाच मागितली. आरोपी शेख याने उपनिरीक्षक यांच्यासाठी ७० हजार तर स्वत:साठी १५ हजार रुपये असे एकूण ८५ हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली.

दरम्यान, तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सापळा रचून आरोपी शेख याला ८५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक क्रांती पवार तपास करीत आहेत.

Previous articleगाडी बाजूला काढा म्हटल्याने घरात घुसून केलेली जबर मारहाण ; सात जणांवर गुन्हा दाखल
Next articleशेतकऱ्याच्या गोठ्यातून जर्सी गाईची चोरी