औदर,आंबोली मध्ये अवैध्य दारूधंद्यावर खेड पोलीसांची कारवाई

राजगुरुनगर – खेड तालुक्यातील औदर व आंबोली गावात खेड पोलिसांनी अवैध दारू धंद्यांवर कारवाई करून दारूचा साठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,भरत पंढरीनाथ मेदगे ( रा.औदर,ता.खेड) यांच्या घरावर छापा टाकून १६ हजार ३२० रुपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त करण्यात आला तसेच गणेश बाबुराव केदारी (रा. आंबोली,ता.खेड ) यांच्यावर छापा टाकून १० हजार ९२० रूपयांचा देशी विदेशी दारू साठा जप्त केला आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई खेड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले , पो.अंमलदार सचिन जतकर , स्वप्नील गाढवे,विशाल कोठावळे,रमेश दाते यांच्या पथकाने केली.

Previous article“समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल्ड” या संस्थेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी रोजगार मेळावा संपन्न
Next articleनववर्षाच्या स्वागतासाठी हाँटेल मराठा सज्ज