दावडी येथे सी. के .गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना(N.S.S.) विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

राजगुरुनगर- जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती. सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दावडी ( ता.खेड जिल्हा पुणे ) येथे रविवार दि.२६/१२/२०२१ ते शनिवार दि. १/१/२०२२ या कालावधीत संपन्न होणार आहे

शिबिराचे उद्घाटन उद्या (दि.२६) रोजी सायं ४:०० वा असून याप्रसंगी आमदार दिलीपशेठ मोहिते, पं.स.सभापती श्री. अरुण भाऊ चौधरी, उपसभापती सौ.वैशालीताई गव्हाणे, जनता शिक्षण संस्था अध्यक्ष श्री. पोपटराव देवकर, जनता शिक्षण संस्था सचिव, श्री.सुभाषराव गारगोटे, सरपंच श्री.संभाजी घारे, ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिबिरामध्ये श्रमदान, व्याख्यांनमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, याबरोबर समाज प्रबोधन, महिला सबलीकरण, कोरोना जनजागृती, आरोग्य जागृती, ग्रामस्वच्छता, पर्यावरण जागृती, वृक्ष संवर्धन, जलसंधारण, अक्षय उर्जा जागृती, व्यक्तिमत्व विकास, ग्राम सर्वे, इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

व्याख्यानमाले अंतर्गत: श्री संपत गारगोटी-शिवछत्रपती शिवाजी महाराज, श्री. सतीश सुरवसे-कथाकथन, श्री.अतुल सवाखंडे-सर्प समज-गैरसमज, श्री.ज्ञानदेव निटवे-व्यक्तिमत्व विकास, श्री. मनोहर मोहरे-संस्कार रूजवा जीवन फुलवा, कु. दीक्षा शिंदे-मी सावित्री बोलतेय, या विषयांवर व्याख्याने होणार आहे.
संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मनोरंजन प्रबोधन अंतर्गत समाज प्रबोधन पर प्रसंग नाट्य, वराड निघाले लंडनला- एक पात्री प्रयोग, संमोहन कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, वैयक्तिक- सामुहिक नृत्य, मिमिक्री, मॉडेल्स यासारखे कार्यक्रम होणार आहेत.

शिबिराचा समारोप रविवार दिनांक १/१/२०२२ रोजी सकाळी १०:०० वा. होणार आहे यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्री.महेशदादा लांडगे, जि.प. अध्यक्ष सौ.निर्मलाताई पानसरे, जि.प. सदस्य श्री. बाबाजीशेट काळे, जि.प. सदस्य-अतुलभाऊ देशमुख, जनता शिक्षण संस्था अध्यक्ष-पोपटराव देवकर, सचिव-सुभाष गारगोटी, मयूरशेठ मोहिते, श्री.बापूसाहेब थिटे, श्री. विजयसिंह शिंदे, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, पोलीस पाटील उपस्थित राहणार आहेत.

सात दिवसीय शिबिरामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे एकूण 75 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
शिबिराचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ बाळासाहेब माशेरे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. दिपाली खर्डे, प्रा. उत्तम गोरड, प्रा. दर्शन बागडे, प्रा. अमरदीप गुरमे हे करणार आहेत.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी यांचे शिबिरासाठी मार्गदर्शन लाभणार आहे.

शिबिरासाठी गावच्या वतीने श्री. संभाजी घारे (सरपंच) श्री. राहुल कदम (उपसरपंच) सौ. माधुरी खेसे, सौ.राणी डुबरे, श्री. अनिल नेटके, सौ. पुष्पा होरे, श्री दादाभाऊ दुधावडे, सौ. प्रियंका गव्हाणे, श्री दत्तात्रेय ओंबळे, सौ संगीता मैंद, सौ. मेघना ववले, श्री. संतोष सातपुते, सौ. धनश्री कान्हुरकर, श्री.तानाजी इसवे,(हे सर्व ग्रा. सदस्य) श्री.आत्माराम डुबरे (पोलीस पाटील) श्री. तुकाराम गाडगे, श्री.सुरेश डुबरे, श्री.किसन दिघे, श्री.संतोष गव्हाणे, (हे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य) श्री. साहेबराव दुंडे, श्री.रामदास बोत्रे, सौ.उज्वला शिंदे(हे सर्वचेअरमन विविध कार्यकारी सोसायटी) हे सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून शिबिरासाठी सहकार्य करणार आहे.

Previous articleशरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न
Next articleखेड तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी बारकू जाचक