शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न

चाकण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पाईट पिंपरी जिल्हा परिषद गटातील बिरदवडी ( ता.खेड ) येथे भरवण्यात आलेल्या भव्य आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत आंबेठाण येथील फायनल सम्राट संतोष मांडेकर यांच्या हमराज मृत्युंजय ग्रुप संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते मानाचा करंडक आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील,माजी सभापती रामदास ठाकूर,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर,नवनाथ होते,वसंत भसे,अंकुश राक्षे,जीवन खराबी,दिनेश मोहिते,तृप्ती मांडेकर,हनुमंत कड,संघमित्रा नाईकनवरे,शांताराम चव्हाण, दत्ता गोतारणे,मोहन पवार,कल्पना पवार,निलेश थिगळे,आशिष येलवंडे, विशाल नाईकवाडी, राहुल नाईकवाडी आदींसह क्रिकेट खेळाडू आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चार दिवस झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील अनेक नामवंत संघांनी सहभाग घेतला होता.यामध्ये दुसरा क्रमांक जय हनुमान स्पोर्टस शेळपिंपळगाव,तिसरा क्रमांक उपसरपंच जयसिंग दरेकर स्पोर्टस फाऊंडेशन पाईट आणि चतुर्थ क्रमांक निखिल कविश्वर स्पोर्टस फाऊंडेशन लोणावळा यांनी पटकावले.तसेच सामनावीर,सहा षटकार,सहा चौकार,उत्कृष्ट गोलंदाज,फलंदाज आदी वयैक्तिक बक्षिसे देण्यात आली.

या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमंद,पाईट पिंपरी जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण,युवक नेते यशोधन मुळे,विशाल मांडेकर,ग्रा.पं. सदस्य अमोल दवणे,सुरेश शेवकरी,शरद वाडेकर,दत्ता शिळवणे,तुकाराम मिंडे आदींनी केले होते.

Previous articleBreaking news- शेलपिंपळगाव येथे ३८ वर्षाच्या युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या
Next articleदावडी येथे सी. के .गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना(N.S.S.) विभागाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन