दावडी ग्रामपंचायतीच्या वतीने शिक्षकांना टॅब व अंगणवाडी शाळांना वॉटर फिल्टरचे वितरण

राजगुरुनगर- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीमंत सयाजीराव गायकवाड संस्थान दावडी (ता.खेड) येथे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना टॅब व अंगणवाडी शाळांना वॉटर फिल्टरचे ग्रामपंचायतीच्या वतीने
वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दावडी येथे घेण्यात आला.

यावेळी दावडी शाळेतील शिक्षकांना १५ टॅब वितरीत करण्यात आले तसेच अंगणवाडी शाळांना ८ ऑरो वॉटर फिल्टर देण्यात आले.


यावेळी संभाजी आबा घारे सरपंच, उपसरपंच राहूल कदम, ग्रा.प श्री संतोष सातपुते, ग्रा. प श्री अनिल नेटके,रोहन( भैय्या) मोहिते पा,ग्रा.प सदस्या सौ.पुष्पा होरे, सौ.धनश्री कान्हुरकर , सौ.राणी डुंबरे, सौ.प्रियंका गव्हाणे, सौ.संगीता मैंद,सौ मेघना ववले, आरोग्य विभाग डॉ.स्नेहा कोतुळकर,मा चेअरमन साहेबराव दूंडे, रामदास बोत्रे, हिरामण खेसे, आनंद शिंदे,प्रकाश शिंदे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अकबर इनामदार, तेजस दिघे, संतोष मांजरे, मुख्याध्यापक, शिक्षक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleशरद चौधरी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Next articleतळेगाव मध्ये सतरा वर्षीय युवकाची डोक्यात हातोडा घालून हत्या : इंस्ट्राग्राम स्टेटस बेतले जिवावर