शरद चौधरी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

अमोल भोसले,उरुळी कांचन

भारतीय जैन संघटना वाघोली येथे तालुकास्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. पुणे जिल्हा परिषद पुणे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पुणे महानगरपालिका सहाय्यक शिक्षण अधिकारी जाधव, महाराष्ट्र राज्यचे कार्याध्यक्ष जी. के .थोरात, मराठी सिने अभिनेता प्रशांत तपस्वी , शेळके प्रकल्प अधिकारी, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, हवेली माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नाळे ,सचिव पवार, हवेली तालुका अध्यक्ष खरात, सचिव कोकाटे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बोधे, माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि लोकशाही संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभ पार पडला. न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर येथील उपशिक्षक शरद गंगाराम चौधरी यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब सातव यांच्या सौजन्याने सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले होते.

मी हा पुरस्कार प्रथम माळशिरस येथील प्रसिद्ध देवस्थान भुलेश्वर आणि खोर येथील पिंपळाची वाडी आणि अष्टापूर मधील भूमीमध्ये असणाऱ्या नाथाच्या चरणी अर्पण करतो. माझे आई-वडील,भाऊ, माझ्या जीवनामध्ये तसेच पुरस्कार मिळण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. तसेच माझी सौभाग्यवती माधवी चौधरी आणि मुलगा सार्थक चौधरी यांचीही साथ लाभली असे शरद चौधरी यांनी पुरस्कार स्विकारताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Previous articleपुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी आमदार दिलीप मोहिते पाटील बिनविरोध
Next articleदावडी ग्रामपंचायतीच्या वतीने शिक्षकांना टॅब व अंगणवाडी शाळांना वॉटर फिल्टरचे वितरण