चिंचवड देवस्थान तर्फे श्री चिंतामणीची संकष्ट चतुर्थी निमित्ताने महापूजा

अमोल भोसले,उरुळी कांचन

आज मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी थंडीच्या कडाक्यामुळे सकाळी भाविकांची गर्दी कमी होती महेश आगलावे यांनी श्रींची पूजा केली. चिंचवड देवस्थान तर्फे श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प.आनंद महाराज तांबे उपस्थित होते.

चिंचवड देवस्थान व आगलावे बंधू यांच्याकडून मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आले होते व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. देवस्थानतर्फे मंदिरात बाहेर ही बॅरिकेट्स लावून पायघड्या घालून दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती,.

देवस्थानतर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटप करण्यात आली. भाविकांना कोरोणाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात होते. देवस्थानतर्फे सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था करण्यात आली होती. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीतर्फे पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.

सायंकाळी ह-भ-प रामनाथ महाराज घोडके यांचे सुश्राव्य किर्तन झाले. चंद्रोदया नंतर श्रींचा छबिना निघाला त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद झाला. श्री क्षेत्र थेऊर येथील माहितीचे श्री चिंतामणी महिमा व सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक महिमा ही पुस्तके भाविकांसाठी विक्रीस उपलब्ध करण्यात आली. श्री क्षेत्र आळंदी येथील स्वकाम सेवा संस्थेच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता राखण्यास मदत केली सर्व व्यवस्थेवर ह भ प आनंद महाराज तांबे लक्ष देऊन होते.

Previous articleकेंदुर मध्ये भरदिवसा ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार; डोक्यात वार करून तरूणाची हत्या
Next articleपुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी आमदार दिलीप मोहिते पाटील बिनविरोध