केंदुर मध्ये भरदिवसा ‘मुळशी पॅटर्न’ चा थरार; डोक्यात वार करून तरूणाची हत्या

पुणे – पऱ्हाडवाडी (केंदूर ता. शिरूर) येथे एका ३५ वस्तीय तरुणाच्या डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना खळबळजनक उघड समोर आली आहे

निलेश उर्फ पप्पू विष्णू पऱ्हाड (वय ३५ रा. पऱ्हाडवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. अद्याप हत्येचे नेमके कारण समजले नसून हल्ल्यानंतर आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि.२१) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पऱ्हाडवाडी येथे घडली.

दरम्यान आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथके रावना करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी सांगितले.

Previous articleमराठी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने तात्काळ मागे घ्यावा -नवाब मलिक
Next articleचिंचवड देवस्थान तर्फे श्री चिंतामणीची संकष्ट चतुर्थी निमित्ताने महापूजा