पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी आमदार दिलीप मोहिते पाटील बिनविरोध

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आमदार दिलीप मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे. बँकेच्या निवडणुकीत खेड तालुका मतदारसंघातून शरद बुट्टे-पाटील आणि हिरामण सातकर यांनी माघार घेतली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘अ’ गटातून बिनविरोध निवड होण्याची ही खेड तालुक्यातील पहिली वेळ असल्याचे मानले जात आहे.

या निवडणुकीसाठी ‘अ’ गटातून आमदार मोहिते, सातकर आणि बुट्टे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुट्टे आणि सातकर यांच्या माघारी झाल्याने मोहिते बँकेवर बिनविरोध निवडले गेले आहेत.

Previous articleचिंचवड देवस्थान तर्फे श्री चिंतामणीची संकष्ट चतुर्थी निमित्ताने महापूजा
Next articleशरद चौधरी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान