भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन केली साजरी

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

कोरोना सारख्या संकटाच्या काळात गेली 5 महिने स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता सदैव नागरिकांच्या संरक्षणार्थ अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवाना आज प्रभागातील भाजपा महिला पदाधिकारी सौ निलांबरी धावडे, सौ सुवर्णा ढगे, रुचिका धावडे यांनी राखी बांधून आजचा हा पवित्र रक्षाबंधन सण साजरा केला व त्यांचे आभार व्यक्त केले.सदर कार्यक्रमास उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंधरकर साहेब, इतर अधिकारी वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा तालुका मा अध्यक्ष अभिजीत श्रीहरी धावडे पाटील यानी केले.

Previous articleश्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाला जाता न आल्याने आनंदोत्सव घरीच केला साजरा
Next articleश्रीराम मंदिराच्या भूमि पुजनाचा आनंदोत्सव वडगाव बुद्रूक येथे पेढे वाटून साजरा