श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनाला जाता न आल्याने आनंदोत्सव घरीच केला साजरा

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

गेल्या ५०० वर्षापासुन अगणित आहुत्या देऊन आपण ज्या दिवसाची प्रतिक्षा करीत होतो तो अत्यंत आनंदाचा व ज्यांनी बलिदान दिले त्या कारसेवकांच्या प्रयत्नांना यश प्राप्तीचा हा दिवस आहे .कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभु श्रीरामाच्या मंदिराचा भुमिपुजन सोहळा आज पंतप्रधान मा . श्री . नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला .

संपुर्ण देशात आज उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपण रामभक्त या सोहळ्यामध्ये पवित्र अयोध्या नगरीत जाऊन प्रत्यक्ष सहभागी होऊ शकलो नाही म्हणून या आनंदोत्सवाच्या दिवशी सौ.सुप्रियाताई ईश्वर भुमकर ( महिला आघाडी अध्यक्ष ( ओ.बी.सी ) खडकवासला मतदारसंघ भारतीय जनता पार्टी, विद्यमान ग्रा.पं. सदस्य नऱ्हे ) यांनी घरीच श्रीराम प्रतिमेचे पुजन व आरती करून जय श्रीरामाच्या जयघोषात पेढे वाटून आनंद साजरा केला .

Previous articleश्रीराम मंदिराच्या भूमि पूजनाचे औचित्य साधून वारजे परिसरात आनंदोत्सव साजरा
Next articleभाजप महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन केली साजरी