टेमघर मध्ये क्लाउज युनियन कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या विहिरीचे लोकार्पण

पिंरगुंट- टेमघर (ता. मुळशी) येथे पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी ग्रामविकास विभाग यांच्या माध्यमातून व क्लाऊज युनियन कंपनीच्या  दहा लक्ष रुपयांच्या ही सीएसआर निधीमधून बांधण्यात आलेल्या विहिरीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

मुळशी तालुक्यातील दुर्गम व डोंगरी भागातील टेमघर धरणाजवळील लावासा रस्त्यालगतची कांगुरमाळ ही अंदाजे चाळीस घरांची धनगर वस्ती परंतु ग्रामस्थांना पिण्याचे पाण्यासाठी बारमाही हक्काचा स्त्रोत नव्हता त्यामुळे येथील महिलांना पिण्याचे पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती, यावर कायमस्वरूपी उपाय योजना व्हावी म्हणून येथील स्थानिक सुशिक्षित तरुण व ज्ञानप्रबोधिनीचे मराठवाडा विभागातील पूर्णवेळ कार्यकर्ते सुरेश मरगळे यांनी याबाबत निधी मिळवण्यासाठी विविध ठिकाणी प्रयत्न केले आणि सदर कामासाठी आवश्यक इतका निधी क्लाऊज युनियन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उपलब्ध करून दिला व ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या समन्वयाने येथील डोंगरावर बारमाही नैसर्गिक झरा असलेल्या ठिकाणी तीस फूट खोलीची विहीर खोदण्यात आली व सभोवताली स्थानिक संसाधनाचा उपयोग करून पक्के बांधकाम करण्यात आले. सद्यस्थितीत येथील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते यापुढील काळात कायमचा पाणीप्रश्न सुटल्या मुळे येथील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.


सदर विहिरीच्या लोकार्पण सोहळा क्लाऊज युनियन कंपनीचे संचालक आनंद देशपांडे, ज्ञानप्रबोधिनी ग्रामविकास विभागाचे प्रमुख विवेकदादा गिरधारी, ज्ञानप्रबोधिनीच्या समन्वयक सुनीताताई गायकवाड, कंपनीचे मॅनेजर नितीन डेरे, सचिन गिड्डे, चिरंजीव शहा, संभाजी खलाटे, सचिन खेर, महेश देवकर व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रबोधिनी साळुंब्रे केंद्राचे प्रमुख व आदर्श शिक्षक व्यंकटराव भतालेजी होते,यावेळी दासवेचे सरपंच शशिकांत मोरे, टेमघर चे माजी सरपंच महादेव मरगळे, वेगरेचे माजी आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे, टेमघर च्या सरपंच रेणुका मरगळे, पोलीस पाटील राहुल मरगळे, उपसरपंच सचिन मरगळे,ज्ञानप्रबोधिनी चे कार्यकर्ते व या विहितीचे संपुर्ण काम पूर्ण करून घेणारे प्रदीप जाधव, दैनिक पुण्यनगरी चे वार्ताहर मारुती कचरे ,संजय कचरे , पुरोहित मीराताई होळकर, शिवाजी उभे, राजेंद्र गुंड, भरत उभे, सामाजिक कार्यकर्त्या लीलाबाई मरगळे,प्राथमिक शिक्षक शिवव्याख्याते तानाजी मरगळे सर, मुगाच्या उपसरपंच ठुमाबाई वाल्हेकर, सरपंच मारुती मरगळे, माजी सरपंच तानाजी मरगळे, कृष्णा कोकरे, ज्ञानेश्वर गोरे, कमळू मरगळे, रामभाऊ गोरे, लक्ष्मण मरगळे, सुनिता मरगळे, इत्यादी व ग्रामस्थ महिला मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

विहिरीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पोलीस पाटील राहुल मरगळे यांनी संस्थेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला तर विहिरीपासून गावापर्यंत पाणी येण्यासाठी लवकरच पाईपलाईनचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल असे सरपंच व उपसरपंच यांनी आपल्या मनोगतात उपस्थितांना सांगितले.

यावेळी सदर विहिरीसाठी दोन गुंठे जागा विनामोबदला बक्षिस दिल्या बद्दल महादेव मरगळे यांचा विशेष सत्कार ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत आदर्श सरपंच भाऊसाहेब मरगळे यांनी व सूत्रसंचालन संस्थेच्या समन्वयक सुनीता गायकवाड यांनी तर आभार शिक्षक तानाजी मरगळे यांनी मानले.

दारू पिण्यासाठी वीस रुपये न दिल्याने मित्राचा खून ;खेड पोलीसांनी आठ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

Previous articleदारू पिण्यासाठी वीस रुपये न दिल्याने मित्राचा खून ;खेड पोलीसांनी आठ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Next articleशंभर झाडांचे वृक्षारोपण करुन पक्ष्यांचा ज्युसबारचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा