दारू पिण्यासाठी वीस रुपये न दिल्याने मित्राचा खून ;खेड पोलीसांनी आठ तासात आरोपीला ठोकल्या बेड्या

पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी

राजगुरुनगर : दारु पिण्यास पैसे दिले नाही या कारणावरून मित्राने आपल्याच मित्राचा लाकडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे बुधवारी (दि.१५) रात्री घडली आहे.

रामदास सोपान थिटे (वय-२७ रा. सडकवस्ती रेटवडी, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नितीन काळूराम काशिद (वय-४२ रा. खरपुडी, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार, बुधवारी रात्री राजगुरूनगर कनेरसर मार्गावर खरपुडी गावच्या हद्दीत हॉटेल माथेरान गारवा येथे मयत रामदास आणि त्याचा मित्र दत्तात्रय टाकळकर दारु पित बसले होते.दरम्यान आरोपी नितीन काशिद हा दारुच्या नशेत पुन्हा दारु पिण्यासाठी आला होता. त्याने मयत रामदास याला दारु पिण्यासाठी २० रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने रामदासला शिवीगाळ केली. रामदास आणि त्याचा मित्र टाकळकर हे दारुच्या नशेत रस्त्यावर आले असताना आरोपी काशिद याने लाकडी दांडक्याने थिटे याच्या डोक्यात जोरात प्रहार केला. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन थिटे याचा जागीच मृत्यू झाला. तर दत्तात्रय टाकळकर हा जखमी झाला आहे.

पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार संतोष घोलप,सचिन गिलबिले, मोहन अवघडे,विजय रहातेकर, बाळकृष्ण साबळे, बाळकृष्ण भोईर, स्वप्नील गाढवे,विजय कोठावळे,स्वप्नील लोहार, रमेश दाते,चालक रमेश करंडे,संजय रेपाळे यांनी आरोपीला घटनेनंतर आठ तासात बेड्या ठोकल्या.

Previous articleसुनिल तांबे युवा मंच आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे राजेंद्र टिळेकर यांचे हस्ते उद्घाटन
Next articleटेमघर मध्ये क्लाउज युनियन कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या विहिरीचे लोकार्पण