शंभर झाडांचे वृक्षारोपण करुन पक्ष्यांचा ज्युसबारचा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा

अमोल भोसले,उरुळी कांचन

भोसलेवाडी उंडवडी येथील पक्ष्यांचा ज्युस बार या महत्वकांक्षी प्रकल्पाचा वर्धापन दिन 100 झाडांचे वृक्षारोपण करून एक मित्र एक वृक्षचे सदस्य, ग्रामस्थ तसेच पोपटराव किसनराव थोरात शिक्षण संस्था खुटबाव चा विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा केला.

पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, विदेशी झाडांची होत असलेले रोपण व देशी झाडांची होत असलेली तोड यामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत आहे. पक्षांना बाराही महिने नैसर्गिक अन्न मिळावे पक्ष्यांचा अधिवास वाढावा म्हणून एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या वतीने पक्षांचा ज्युस बार या संकल्पने अंतर्गत गेल्यावर्षी एक हजार झाडांचे वृक्षारोपणाचे कार्य भोसलेवाडी उंडवडी ता- दौंड जि- पुणे या ठिकाणी पक्षी उपयोगी झाडे लावण्यात आली होती. झाडे लावणे ही खूप सोपी गोष्ट आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती झाडे लावून ती 100% जगवणे ही खूप अवघड गोष्ट होती पण गावातील युवकांनी तसेच एक मित्र एक वृक्ष सदस्यांनी ही सर्व झाडे प्रशांत मुथा व सचिन गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली 100% जगवली आहे.

श्रीदत्त जयंती देवाचे झाड या संकल्पना मांडण्यात आली, आज 50 उंबर वृक्ष व सिद्धी गुंड या लहान मुलीच्या वाढदिवसानिमित्त 50 अशी एकूण 100 झाडांचे रोपण करण्यात आले. यावेळी राणी ताई शेळके यांनी या प्रकल्पासाठी काही प्रमाणात झाडे देणार असल्याचे सांगितले तसेच उद्योजक विशाल भोसले यांनी 100 झाडे, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिक कांबळे 50 झाडे यांच्याकडून देण्यात येणार आहे याही झाडांचे वृक्षारोपण एक मित्र एक वृक्ष सभासदां तर्फे करण्यात येणार आहे असे प्रशांत मुथा यांनी सांगितले.

पक्ष्यांचं ज्युसबार वर्धापनदिना निमित्त वृक्षारोपण उपक्रमा वेळी पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालय, खुटबावचे राष्ट्रीय सेवा योजनाचे 80 विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. उंडवडी ग्रामपंचायत, प्रादेशिक वनविभाग दौंड, उंडवडी ग्रामस्थ यांच्यात संयुक्त विद्यमाने 1000 झाडांचं प्रकल्प उभा राहिला.

यावेळी पुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती राणीताई शेळके, उद्योजक विशाल भोसले, भैरवनाथ शिक्षण मंडळाचे सचिव सुर्यकांत खैरे, व्हा. चेअरमन भाऊसाहेब ढमढेरे, प्राचार्य.डॉ. अविनाश सांगोलेकर सा. प्रा. विशाल सुतार, अंकुश पांढरे, उपसरपंच विकास कांबळे, सदस्या मैना गुंड, तंटामुक्त समिती अध्यक्ष दिगंबर गडदे, मा सरपंच वैशाली गुंड, वसंत कांबळे, मुरलीधर जगताप, जयसिंग होले, अनिल कुल, वनविभागाचे श्री पवार , श्री अडागळे, दौंड तालुका मराठा महासंघ उपाध्यक्ष संजय थोरात व उंडवडी व पंचक्रोशीतील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Previous articleटेमघर मध्ये क्लाउज युनियन कंपनीच्या सीएसआर निधीतून बांधण्यात आलेल्या विहिरीचे लोकार्पण
Next articleनेहरू युवा केंद्र व समाजभूषण गणपतराव काळभोर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जल जागरण प्रशिक्षण