म्हातोबा आळंदी -महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी संदीप पवार तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिवरकर

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील म्हातोबा आळंदी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी संदिप संभाजी पवार यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिवरकर यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच सोनाली जवळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.

प्रास्ताविक माजी उपसरपंच अशोक जवळकर यांनी करुन अध्यक्षपदी संदीप पवार व उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिवरकर यांचे घोषित केले. त्यावेळी वाल्मिक जवळकर यांनी अनुमोदन दिले आहे.  यावेळी  मावळते तंटामुक्ती अध्यक्ष तथा हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

यावेळी तलाठी योगीराज कणीचे, उपसरपंच सुनीता शिंदे, माजी उपसरपंच श्रीहरी काळभोर, सदस्य पारस वाल्हेकर, दयानंद शिवरकर, भगवान जवळकर, दत्तात्रय जवळकर, शंकर जवळकर, विजय जवळकर, आबासाहेब जवळकर, मोहन जवळकर, तेजस शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील जेष्ठ नेतृत्वाने टाकलेला विश्वास तो निश्चितच कामाच्या माध्यमातून एकोपा ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष संदीप पवार यांनी सांगितले.

Previous articleचोरीच्या चार दुचाकीसह चोरटा जेरबंद; दौंड पोलिसांची कारवाई
Next articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये सहा उमेदवार बिनविरोध तर १५ जागेसाठी सहकार पॅनेलचे उमेदवार जाहीर