पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये सहा उमेदवार बिनविरोध तर १५ जागेसाठी सहकार पॅनेलचे उमेदवार जाहीर

अमोल भोसले,पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे या बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूकी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर जिल्हयातील आमदार व पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेसच्या सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार जाहीर. २१ संचलकांच्या जागांसाठी सहकार पॅनेलचे ६ उमेदवार या आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित १५ जागांसाठी आता निवडणूक होत आहे.

सदर बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस (आय) पुरस्कृत सहकार पॅनेलच्या उमेदवारांसदर्भात चर्चा करण्यात आलेली असून सर्वाच्या सहमतीने सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार म्हणून मतदारसंघ निहाय खालील उमेदवार निश्चित करण्यात आले असल्याची माहीत पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांना प्रसिद्धीपत्रका द्वारे दिली.

“अ” वर्ग मतदार संघ (१) अ वर्ग-बारामती – पवार अजित अनंतराव, बिनविरोध. (२) अ वर्ग-आंबेगाव – वळसे दिलीप दत्तात्रय, बिनविरोध. (३) अवर्ग-भोर – थोपटे संग्राम अनंतराव, बिनविरोध. (४) अ वर्ग-पुरंदर – जगताप संजय चंद्रकांत, बिनविरोध. (५) अ वर्ग-वेल्हे – दारवटकर रेवणनाथ कृष्णाजी, बिनविरोध. (६) अ वर्ग-मावळ – दाभाडे ज्ञानोबा सावळेराम, बिनविरोध. (७) अ वर्ग-खेड – मोहिते दिलीप दत्तात्रय. (८) अ वर्ग-शिरूर – पवार अशोक रावसाहेब. (९) अ वर्ग-दौंड – थोरात रमेश किसनराव. (१०) अ वर्ग-जुन्नर – काळे संजय शिवाजीराव. (११) अ वर्ग-मुळशी – चांदेरे सुनिल काशिनाथ. (१२) अ वर्ग-इंदापूर – निंबाळकर रणजित बाबुराव. (१३) अ वर्ग-हवेली – मैत्रीपूर्ण लढत. (१४) ब वर्ग मतदार संघ, इंदापूर – भरणे दत्तात्रय विठोबा. (१५) क – वर्ग मतदार संघ, हवेली – घुले सुरेश मारूती (१६) ड वर्ग मतदार संघ, पुरंदर – दुर्गाडे दिगंबर गणपत. (१७) अनुसुचित जाती जमाती मतदार संघ, हवेली – शिंदे प्रविण बाजीराव. (१८) इतर मागास प्रवर्ग मतदार संघ, बारामती – होळकर संभाजी नारायण. (१९) वि.जा./ भ.ज./ वि.मा.प्र. मतदार संघ, बारामती – येळे दत्तात्रय महादेव. (२०) महिला प्रतिनिधी मतदार संघ,जुन्नर – बुट्टेपाटील पुजा संभाजी, (२१) वेल्हे – जागडे निर्मला कृष्णा.

Previous articleम्हातोबा आळंदी -महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी संदीप पवार तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिवरकर
Next articleम्हाडाची होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध