चोरीच्या चार दुचाकीसह चोरटा जेरबंद; दौंड पोलिसांची कारवाई

दिनेश पवार:दौंड

दौंड पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका आरोपीस जेरबंद करत, चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.

पोलीस स्टेशनमधील डी बी पथकाने धडक कारवाई करत मोटरसायकल चोरीतील एक आरोपी जेरबंद करत त्याचेकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत, आरोपीने सदरच्या दुचाकी कोंढवा, लोणी काळभोर, दौंड या भागातून चोरल्या असल्याची कबुली दिली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की (दि.07 ) रोजी दौंड शहरातील नगर मोरी चौकातून एक दुचाकी चोरी झाले बाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने दौंड डी बी पथक तपास करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेत एक संशयिताला केडगाव येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केलो असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी, पो.हवा. सुभाष राऊत, पो. ना अमोल गवळी, पो.ना आदेश राऊत, पो.ना आमिर शेख,पो.ना निखिल जाधव,पो.कॉ अमोल देवकाते, पो.ना अभिजित गिरमे यांनी केली असून अधिक तपास पोलीस नाईक आमिर शेख करीत आहेत

Previous articleगुळाणीत नागरिकांना योगा प्रशिक्षण
Next articleम्हातोबा आळंदी -महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी संदीप पवार तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब शिवरकर