खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार हे अभ्यासू लोकप्रतिनिधी- प्रदिप गारटकर

अमोल भोसले,उरुळी कांचन

दूरदृष्टी विचार अत्यंत महत्त्वाचा आहे समाजकारण राजकारण करत असताना तो विचार जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या कामातून आपल्या पाहायला मिळतो. तुम्ही सर्व जण खूप भाग्यवान आहात की खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या सारख्या लोकप्रतिनिधींंना निवडून दिले हि मंडळी सातत्याने आपल्या मतदार संघातील विविध विकास कामाच्या बाबत पक्ष नेतृत्व व राज्य शासन – केंद्र सरकार दरबारी समस्या मांडताना पाहत आहात. सरपंच विठ्ठल शितोळे व त्याच्या सर्व सहकारी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने गावातील विविध विकास कामाकरिता जास्तीतजास्त निधी आण्याचा प्रयत्न झाला असल्याने गावाचा चेहरामोहरा निश्चितच बदलेल असे मत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी व्यक्त केले.

 

कोरेगावमुळ (ता.हवेली) याठिकाणी २ कोटी ११ लाख १७ हजार रुपयांची विविध विकास कामे मंजूर झाली त्या कामाचे भूमीपूजन शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

 

यावेळी सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच लीलावती बोधे, हवेली ता. पंचायत समितीचे सभापती अनिल टिळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, हवेली ता. रा. काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली रा.यु.काँग्रेस अध्यक्ष योगेश शितोळे, चेअरमन राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी, सरपंच संतोष कांचन, सरपंच सचिन सातव, सरपंच सुरज चौधरी, मा.सरपंच आण्णा महाडिक, पु.जि.नि.स.सदस्य संतोष कांचन, जेष्ठ नेते रघुनाथ चौधरी, अमित कांचन, राजेंद्र कांचन, सागर कांचन, ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब बोधे, भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, मंगेश कानकाटे, सचिन निकाळजे, सदस्या मनीषा कड, अश्विनी कड, वैशाली सावंत, राधिका काकडे, मंगल पवार, पल्लवी नाझीरकर, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कदम, पै.आबा काळे, शरद शितोळे, प्रितम शितोळे, प्रविण शितोळे, गणेश शितोळे, चंद्रशेखर शितोळे, जयसिंग भोसले, नंदकिशोर कड, बाळकृष्ण भोसले, विठ्ठल कोलते, संपत डिंबळे, वर्षा कड, आप्पा कड, दिलीप शितोळे, सुभाष टिळेकर, राजेंद्र चौधरी, बाबासाहेब चौधरी, प्रा.सुरेश वाळेकर, बाळासाहेब बोधे, मानसिंंग कड आदी उपस्थित होते.

 

कामासाठी मिळालेल्या निधितुन ते काम योग्यप्रकारे होत आहेत का नाही याची जबाबदारी ठेकेदार सह नागरिकांची ही असून गुणवत्ता नसलेले काम तात्काळ बंद करावे अश्या सुचना आमदार अशोक पवार यांनी दिल्या.

Previous articleकोरेगावमुळ येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन
Next articleअपघातग्रस्त ठिकाणी बांधकाम खात्याने तातडीने केली दुरुस्तीला सुरुवात ; अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नांना यश