अपघातग्रस्त ठिकाणी बांधकाम खात्याने तातडीने केली दुरुस्तीला सुरुवात ; अजिंक्य टेकवडे यांच्या प्रयत्नांना यश

अमोल भोसले,उरुळी कांचन

जेजुरी ,मोरगाव रोडवर जवळार्जुन फाटा येथे रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे चार अपघात झाले व त्याअगोदर गेल्या पाच ते सहा महिन्यात जवळपास 100 ते 110 छोटे-मोठे अपघात झाले. त्यामुळे मावडी व जवळार्जुन येथील संतप्त नागरिकांनी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अजिंक्यभैय्या टेकवडे यांनी रस्त्याची दुरुस्ती करून अपघाताचे सत्र न थांबविल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.

त्याचबरोबर संबंधित कामासाठी बारामती मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी संपर्क साधला. तसेच मा.अशोकभाऊ टेकवडे (मा. आमदार), माणिकराव झेंडे पाटील (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर तालुका), बापूसो भोर, सुकुमार भामे, सोमनाथ कणसे (सरपंच) या सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे कालच सार्वजनिक बांधकाम खात्याने काल सायंकाळी पाच वाजता रस्ता दुरुस्ती सुरुवात करून अपघात होऊ नयेत म्हणून इतरही उपाययोजना करण्याचे नियोजन तातडीने सुरू केले आहेत. बांधकाम खात्याने दखल घेऊन दुरुस्ती करण्यास सुरुवात करून पुढील अपघात टाळणे बाबत नियोजन केल्यामुळे अजिंक्यभैय्या टेकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले व शासनाने दखल घेतल्याबद्दल व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी त्वरित दखल घेतल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.

यावेळी सचिन टेकवडे (ग्रा. पं. सदस्य), तेजस चाचर, दत्तात्रेय भामे, सोमनाथ खोमणे सर, महेंद्र भामे, विकास चाचर, विठ्ठल झगडे, आकाश चाचर, संतोष भामे, नारायण गुळूमकर, संतोष टेकवडे, तुषार लव्हाळे, अनिकेत लव्हाळे, सनी चाचर, दादा पांडे, राजेंद्र जगताप, ओंकार टेकवडे, हरी गोळे व मावडी क.प. आणि जवळार्जुन गावचे नागरिक उपस्थित होते.

Previous articleखासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार हे अभ्यासू लोकप्रतिनिधी- प्रदिप गारटकर
Next articleप्रवचनाचे मानधन नाकारून कोरोनाने वडील गमावलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी पंकज महाराज गावडे यांनी ६ लाख रुपयांची केली मदत