कोरेगावमुळ येथे विविध विकास कामाचे भूमीपूजन

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील कोरेगावमुळ याठिकाणी उद्या रविवार (दि.५) रोजी सकाळी ९ वाजता २ कोटी ११ लाख १७ हजार रुपयांची विविध विकास कामे मंजूर झाली त्या कामाचे भूमीपूजन शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते तसेच शिरुर लोकसभा मतदार संघाचे संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे विशेष उपस्थितीत संपन्न होणार असल्याची कोरेगावमुळचे सरपंच विठ्ठल शितोळे यांनी दिली.

 

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी सभापती जिल्हा परिषदेच्या सुजाता पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा भारती शेवाळे, हवेली तालुका पंचायत समितीचे सभापती अनिल टिळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, माजी सभापती वैशाली महाडिक, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश शितोळे, राष्ट्रवादी महिला कॉग्रेस हवेली ता. अध्यक्षा सुरेखा भोरडे तसेच विविध गावचे सरपंच- उपसरपंच व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती उपसरपंच लिलावाती बोधे यांनी दिली.

Previous articleमावळच्या सुपुत्रांचे नेमबाजी स्पर्धेत यश
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार हे अभ्यासू लोकप्रतिनिधी- प्रदिप गारटकर