कस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सर्विसरोडचे पाणी उपसून रस्ता केला मोकळा

अमोल भोसले,उरुळी कांचन

गेल्या २-३ दिवसात झालेल्या सततच्या पावसाने उरुळी कांचन येथील पुणे-सोलापुर महामार्गावरील इरिगेशन कॉलनी नजीक, सदगुरु साडी सेंटरच्या समोर पावसाचे पाणी साठुन नदीचे स्वरुप आले असताना सामाजिक भावनेतून कस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सेवा सर्विसेस यांच्या मदतीने रसत्यावरील पाणी उपसुन नागरिकांना रस्ता उपलब्ध करुन दिला.

ग्रामपंचायतच्या माध्यमातून सार्वजनीक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे तरी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत येथील व्यापारी वर्गाचे मत आहे. आतापर्यंत अनेक छोटे अपघात झाले आहेत.

Previous articleगणेश टिळेकर व विकास कोतवाल यांची डॉ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी बिनविरोध निवड
Next articleअन्यथा राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करू – खा. डॉ अमोल कोल्हे