गणेश टिळेकर व विकास कोतवाल यांची डॉ.मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी बिनविरोध निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

डॉ मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानची सर्व सभासदांच्या उपस्थित मध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. टिळेकरवाडी येथील डाळिंब उत्पादक गणेश निवृत्ती टिळेकर व अष्टापूर येथील विकास आण्णासाहेब कोतवाल यांची डॉ मणिभाई कृषी विकास प्रतिष्ठान शच्या विश्वस्तपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

कोरोनाचा आढावा घेऊन फेब्रुवारी २०२२ मध्ये कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा मानस सर्व सभासद यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी डॉ मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कांचन, उपाध्यक्ष सुनिल गोते, सहकार्याध्यक्ष सागर कांचन, खजिनदार सोमनाथ कोतवाल, जेष्ठ विश्वस्त संजय टिळेकर, सचिव रोहिदास कोतवाल, सहसचिव संजय कांचन, विश्वस्त हरिदास गोते, नवनाथ मोहिते, काकासाहेब दौंडकर, सुभाष कड, गोविंद तापकीर, पोपट साठे आदी उपस्थित होते.

Previous articleसामाजिक बांधिलकी जपणारा दानशूर पोलीस :नारायण पवार
Next articleकस्तुरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सर्विसरोडचे पाणी उपसून रस्ता केला मोकळा